| श्री गोपालकृष्ण भगवान की जय |
भगवान श्री मुंगसाजी महाराज की जय ।। श्री भगवान पुंडलिक बाबा की जय ।।
आदीशक्ती -संत सखू माता की जय । प.हं. देविदास महाराज की जय ।
॥ जय माऊली ॥
प.ह.देविदास महाराज (आरती)
(चाल :- आरती ज्ञानराजा)

आरती देविदासा – लाभो, भक्तां दिलासा |
कृपावंत, होयीदासा – दयावंत, परमहंसा ॥। धू. ।।
धन्य ती, “शांता माता”, “तैसा काटूजी पिता”,
करजगांवी, संतकृपा – झाला भाग्योदय ऐसा … ॥ १ ॥
कल्याणालागी संत – कधी घेईना, उसंत ।
चालीता, चाली ऐसा – देयी भक्ता, भरवसा …. ॥ २ ॥
देवदूत, पुन्हा आला – जगतासी तारण्याला ।
ओळख नाही पटली – सदा करीती प्रयासा … ॥ ३ ॥
कृपेविना, कधी कुणी – नसे सुखी समाधानी ।
“पंढरीदास” नमीतो – महासिध्द देविदासा… ॥ ४ ॥

* आरती *

( चाल :- आरती ज्ञानदेवा , जय जय सदाशिवा)
जय जय देविदासा- परमहंसा ।
भावार्थे करु पुजा – आरती देविदासा ॥धृ।।
येता जन्मासी-गांवासी । उध्दरीले महाराजा…..॥१।।
घेती प्रचिती – भक्त किती | सकलांचा तु दिलासा….॥२॥
गजानन, मुंगसाजी – तुज माजी | अंतरी तो प्रभु राजा….॥3॥
ऐसा कैवारी- जग तारी | तूजविण कवण भरवसा…..॥४॥
काशीचे संन्यासी – तुजपासी | येऊनी करीती पुजा…॥५॥
अंती वंदुनिया – तव पाया | उध्दरी पंढरी दासा….॥६॥

श्री संत देविदास बाबा यांच्या दरबारातील नित्य म्हटली जाणारी आरती

ओवाळू आरती माझ्या देविदासाला | माझ्या देविदासाला ॥
कलीयुगामध्ये संत अवलीया झाला ॥धृ.।।
चोविस वर्ष वनवासात तपश्चर्या आचरिले । स्वामी तपश्चर्य आचरिले।
सोडुनीया घरदारा, सोडुनीया घरदारा। बाबा वैरागी झाले ॥…….ओवाळू आरती ॥१॥
सत्य तुमची वाणी | सकला अनुभवा आली |
श्रद्धा तैसी फळे | पाखर मायेची घाली ॥……….. ओवाळू आरती ॥2॥
झिझवुनी अपुली काया । अंती साधिला योग ।
दर्शन तुमचे घडता | चुकतो दैवाचा भोग ॥……… ओवाळू ‘आरती ॥3॥
धन्य-धन्य भुमी । जन्म करंजगांवत ।
उद्धराया जगता । फिरता राना-वनात ॥:……:… ओवाळू आरती ॥४॥।
लोभ, माया, राग, व्देष | पळविले दूरी
तेजपुंज, कांती । बापू चरणाशी धरी………….. ओवाळू आरती ॥५॥