॥ श्री गजानन महाराज समर्थ ॥
घडो आज सेवा – अशा माऊलीची | जियेची दया आज – आहे भक्तांसी ॥
मला सांगण्यासी – हर्ष होय चित्ता । नमो देविदासा – महा थोर संता…. ॥१॥
जया आळविता – प्रचिती मिळे हो । अशा श्रेष्ठ संता – त्वरे आळवाहो |
अन्यथा कुठे ना-दिलासा अनाथा । नमो देविदासा – महा थोर संता…॥२॥
सदा सानिध्याची – अपेक्षा जनासी । अमुच्या संन्निधी – असे हा उदासी ॥
कृपावंत होयी-भक्तांते समस्ता | नमो देविदासा – महा थोर संता….॥३॥
जे त्यार ध्याता – मिटे सर्व चिंता । तया आठविता – सुटे व्यर्थ गुंता ॥
अनाथा मिळे तो -आकस्मिक त्राता। नमो देविदासा – महा थोर संता ….॥४॥
असा संत पुन्हा – मिळेना तुम्हासी | बहु भाग्यवंत – किती पुण्य रासी ॥
सदा अंतरासी – असू द्या समर्था | नमो देविदासा – महा थोर संता…॥५॥
उपेक्षित लाचार – पिडीत कुणी | तयास्तव आला – महा ब्रम्ह ज्ञानी ॥
अशी योग्य वेळा – दुर्लक्ष सर्वथा | नमो देविदासा – महा थोर संता …॥६॥
पुण्य क्षेत्र झाले – जिथे संत आले | भक्तिधाम कैसे – असाध्य साधिले ॥
इथे प्रसन्नता – दिसेहो पहाता । नमो देविदासा – महा थोर संता…. ॥७॥
भ्रमंती पळाली-सुशांती मिळाली | पुढे धावण्याची-गती शांत झाली ॥
म्हणे पंढरीदास – प्रचिती येता । नमो देविदासा – महा थोर संता…॥८॥