आपल्या महाराष्ट्राला संतकर्वीची फार मोठी देणगी लाभली आहे. संतकवी, चरित्रग्रंथकार – पंढरीदास महाराज, खर्डेकर, यांचा संत साहित्य प्रचार प्रसार कार्यात-मोलाचा वाटा आहे. अतिशय गरीब, कष्टकरी, मजुर, कुटुंबात जन्माला येवून कुठल्याही लोभाला बळी न पडता त्यांनी आपला जीवन परमार्थ साधला. आजपर्यंत त्यांनी अनेक साधुसंतांचे चरित्रग्रंथ तसेच स्तोत्र, भजन इत्यादी लिखान केलेले आहे. त्यामध्ये उल्लेखनीय म्हणजे परमहंस श्री संत मुंगसाजी महाराज चरित्र ग्रंथ,संत सांभाजी महाराज चरित्र, प.हं. पुंडलिक गीता चरित्र, संत सखुबाई चरित्र, संत सोनाजी, संत नागाजी महाराज, संत सुखदेव बाबा आदी महा
पुरुषांच्या जीवन चरित्रावर अनेक ग्रंथ लीहीलीत,तसेच आकाशवाणी वरुनही विविध साहित्यिक सामाजिक, चिंतनाद्वारे विचार मांडले. त्यांच्या संपूर्ण कार्याचा गौरव त्यांना विविध पुरस्कार देवून जाणकार समाजाने तथा महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे. देविदास महाराजांबद्दलचा एक अनुभव माझ्यासमोर कथन करत त्यांनी सांगितले की, सन २००९ मध्ये त्यांना ब्रेनट्युमर हा आजार जडला होता व के.ई.एम., मुंबई येथील डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन न केल्यास जगण्याची शाश् वती नसल्याचे सांगितले होते त्यानुसार ऑपरेशनची तयारीही झाली होती परंतू ऑपरेशन करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी तेथून निघून जावून थेट वाळकेश्वर मुंबई येथे
श्री मुंगसाजी महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले व ‘तुच तारणारा तुच मारणारा आहेस’ असे म्हणून मौनस्थ स्वःग्रामी लोही येथे परतले. तद्नंतर त्यांनी देविदास महाराजांचे दर्शन घेतले असता आमचे चरित्र स्तोत्र लिहील्याशिवाय जात नाही असे म्हणत श्री संत देविदास महाराजांनी त्यांना आशिर्वाद दिला होता. त्यानुसार आजपर्यंत ते कुठलाही औषधोपचार न करता सुखरुप असून संतांप्रती अखंड साहित्य सेवा करित आहेत. त्यांच्याप्रती खालील गौरवपुष्प लागु होतात………
ऐसी सेवा करुनिया । परमार्थ साधिला मृत्यू लोकी या | नरजन्माचे सार्थक करुनिया वेचलेची जिवन अपुले ॥
दि. २४ डिसेंबर २०२२ लक्ष्मण सुरेशराव मुळतकर,कारंजा(लाड) जि.वाशिम (एक भक्त)